कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा आणि अन्न व औषध प्रशासनाचा संयुक्त बडगा

फलटण( पुढारी वृत्तसेवा ) शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीविरोधात फलटण शहर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 41 हजार 180 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला असून एका संशयितास अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ जून २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नरसोबानगर, कोळकी (ता. फलटण) येथे किरण शशिकांत दोशी यांच्या घरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग, सातारा यांनी फलटण शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी किरण शशिकांत दोशी (रा. नरसोबानगर, कोळकी, फलटण) यांच्यासह विविध गुटखा व पान मसाला उत्पादक कंपन्यांचे मालक, भागीदार आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याप्रकरणी किरण दोशी यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.

समाज प्रबोधन : गुटखा म्हणजे आरोग्याचा मूक घातक

गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू हे पदार्थ केवळ कायद्यानेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत घातक मानले जातात. तोंडाचा कर्करोग, दात व हिरड्यांचे आजार, हृदयविकार आणि व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर समस्यांना हे पदार्थ कारणीभूत ठरतात. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे व्यसन ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, खरेदी अथवा साठवणूक आढळल्यास नागरिकांनी तत्काळ संबंधित प्रशासनाला माहिती देऊन समाजहिताच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!