फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी )
फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी दुतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प 2026 -27 अंतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पेरणीपूर्वी बियाण्यांना रोग, किडी व बुरशी पासून संरक्षण मिळावे यासाठी जैविक व रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता व रोगप्रतिकारशक्ती वाढते उत्पादन व गुणवत्तेत सुधारणा होते तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो हे कृषीदुतांनी स्पष्ट केले यावेळी बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचा वापर योग्य प्रमाण व पद्धती यांचे सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस डी निंबाळकर सर कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नीतिशा पंडित व वनस्पती रोग विज्ञान विषय मार्गदर्शक प्राध्यापक पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे ,धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे व तुषार ठेंगल यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.






