अक्षय बापूराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन; रक्तदानासह जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

फलटण( आपलं फलटण खटके वस्ती प्रतिनिधी)
अक्षय बापूराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त खटकेवस्ती तालुका फलटण येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने नागरिकांसाठी अनेक लोकहिताचे आणि शासकीय योजनांशी संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रविवार, दि. १० जून रोजी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत मैदान, खटकेवस्ती येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यावर भर देण्यात आला आहे. खराब किंवा हरवलेल्या रेशनकार्डधारकांना नवीन रेशनकार्ड काढून देणे, रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणी, महिलांसाठी एस.टी. बस प्रवास सवलत पास काढून देणे, बांधकाम कामगार योजनेतील फिल्टर वाटप, नव्या बांधकाम कामगारांसाठी पेटी वाटप तसेच संजय गांधी निराधार योजनेची नवीन प्रकरणे दाखल करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने भव्य रक्तदान शिबिरही भरविण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी सस्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत विकासकामांना गती देण्याचा आणि सर्वसामान्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत असल्याने परिसरात कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!