सात वर्षीय चिमुरडीशी गैरवर्तनप्रकरणी संशयितास अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आसु) येथे सात वर्षीय चिमुरडीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयितास अटक केली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ५) सकाळी संबंधित चिमुरडीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर गेले होते. घरात मुलगी व तिची आजी असे दोघीच होत्या. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मुलीची आई घरी परतल्यानंतर चिमुरडी रडत तिच्याकडे आली. यावेळी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हाताने खुणावून घरात बोलावले आणि तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचे तिने आईला सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पालकांनी तत्काळ फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, हणमंतवाडी (आसु) येथील तक्रारदाराच्या घराजवळीलच एका व्यक्तीने दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान चिमुरडीला घरात बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रार प्राप्त होताच फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. बालकांच्या संरक्षणासंदर्भातील लागू कायद्यांनुसार कारवाई करत संशयिताला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून, घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!