दुधेबावीत फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन गावठी पिस्टलसह चौघे जेरबंद

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा )फलटण ग्रामीण पोलिसांनी दुधेबावी परिसरात राबविलेल्या धाडसी कारवाईत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, पल्सर दुचाकी आणि मोबाईल फोनसह तब्बल २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतीक प्रमोद खुंटे (रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे) हा त्याच्या साथीदारासह गावठी पिस्टल घेऊन दुधेबावी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुधेबावी परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित आरोपी पल्सर मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. फलटण-दहिवडी मार्गावर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतीक खुंटे (वय २५) आणि प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे (वय २१, रा. काळुबाईनगर, साखरवाडी, ता. फलटण) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान प्रतीक खुंटे याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत तपासाची व्याप्ती वाढविली असता, आणखी एक गावठी पिस्टल करण कानिफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण) याला विकल्याचे निष्पन्न झाले. या व्यवहारात समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे (वय २२, रा. मांडवखडक, ता. फलटण) याचीही भूमिका समोर आली. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत दुसरे गावठी पिस्टल जप्त केले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक पल्सर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चौघा आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान अटक आरोपींपैकी प्रतीक खुंटे आणि करण घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या टोळीचे इतर गुन्हेगारी कृत्यांशी असलेले संबंध तपासले जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांच्यासह नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हणुमंत दडस, सुरज काकडे, गणेश यादव, विक्रम बनकर, तुषार नलवडे व अमोल देशमुख यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    ग्राम सुरक्षा यंत्रणेला निधीअभावी कुलूप; ३० जूनपासून सेवा बंदसातारा जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाख ग्रामस्थांवर परिणाम; आपत्कालीन सूचना व्यवस्थेवर संकट

    फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी )ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे संदेश तात्काळ पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा निधीअभावी येत्या…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!