राम निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यशनिंबळकमधील विविध रस्ते विकासकामांसाठी तब्बल अडीच कोटींचा निधी मंजूर

फलटण(निंबळक प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील निंबळक ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्ते विकासकामांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामागे ग्रामविकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राम निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला असून, गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
मंजूर कामांमध्ये निंबळक इरिगेशन बंगला ते वाजेगाव रस्ता डांबरीकरणासाठी एक कोटी रुपये, तसेच निंबळक कॅनॉल ते बाबा ढाबा परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी ७५ लाख रुपये आणि कॅनॉल ते बोडकेवस्ती रस्ता काँक्रिटीकरणासाठी ७५ लाख रुपये निधीचा समावेश आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
गावाच्या विकासासाठी राम निंबाळकर यांनी विविध योजनांचा सातत्याने पाठपुरावा करून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे निंबळकच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली असून, गावातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
दरम्यान, संबंधित रस्त्यांची पाहणी करताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजूर कामांना लवकरच सुरुवात केली जाईल, अशी माहिती दिली. या निधीमुळे निंबळकच्या विकासाला नवी चालना मिळणार असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!