पर्यावरण दिनानिमित्त विठ्ठलवाडीत वृक्षारोपणकृषीदूतांचा पुढाकार; वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांनी घेतला संकल्प

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचा संदेश देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विठ्ठलवाडी (ता. फलटण) येथे कृषीदूतांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धनाचा संकल्पही केला.
गाव परिसर तसेच शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थितांनी केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी कृषीदूतांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीत पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. पृथ्वीचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला पाहिजे. विठ्ठलवाडीतील ग्रामस्थांनी दाखविलेला उत्साह आणि सहभाग इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी या मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत केले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नीतिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे आणि तुषार ठेंगल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विठ्ठलवाडीतील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, हरित आणि स्वच्छ पर्यावरणासाठी सामूहिक सहभागाची गरज पुन्हा अधोरेखित झाली.

Spread the love
  • Related Posts

    झाडे लावलीही आणि जपलीही तितक्याच मायेने…अधिवक्ता परिषदेने साजरा केला १५ वृक्षांचा चौथा वाढदिवस”

    आपलं फलटण (प्रतिनिधी)जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अधिवक्ता परिषद, फलटण तालुका यांच्या वतीने चार वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या १५ वृक्षांचा चौथा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित…

    Spread the love

    कृषीकन्यांची जय तुळजाभवानी रोपवाटिकेला अभ्यासभेट; अत्याधुनिक रोप निर्मिती तंत्रज्ञानाचे घेतले धडे

    फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत कृषीकन्यांनी स्थानिक जय तुळजाभवानी रोपवाटिकेला अभ्यासभेट देत अत्याधुनिक रोप निर्मिती तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!