फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)
कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत कृषीकन्यांनी स्थानिक जय तुळजाभवानी रोपवाटिकेला अभ्यासभेट देत अत्याधुनिक रोप निर्मिती तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या भेटीदरम्यान कृषीकन्यांनी रोपवाटिकेतील विविध फळझाडे, भाजीपाला व फुलझाडांच्या लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच रोपांची निर्मिती, संगोपन, विक्री व्यवस्थापन आणि रोपवाटिका व्यवसायातील संधी याविषयी मार्गदर्शन घेऊन कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.
रोपवाटिकेचे संचालक व तज्ज्ञांनी विद्यार्थिनींचे स्वागत करून रोपवाटिका उभारणीपासून तिच्या यशस्वी व्यावसायिक व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार रोपे तयार करण्याच्या पद्धतींची माहितीही त्यांनी दिली.
या अभ्यासभेटीसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, प्रा. नीतिशा पंडित, प्रा. जी. बी. अडसूळ व प्रा. रश्मी नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
अभ्यासभेटीत कृषीकन्या साक्षी नाझीरकर, विद्या नवले, जोगेश्वरी लोकरे, श्रावणी भागवत, मोनाली कोळपे, अस्मिता नेवसे आणि गौरी जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आधुनिक उद्यानविद्या व रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याने त्यांच्या कृषी शिक्षणाला नवी दिशा मिळाली.








