सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल१८ जूनला मतदान; २२ जूनला मतमोजणी, आचारसंहिता तात्काळ लागू

फलटण : वृत्तसेवा: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून मतदारसंघात तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे तसेच ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. यापूर्वी हे निकष पूर्ण न झाल्याने निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आता आवश्यक निकष पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आयोगाला दिल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडणुकीसाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सांगली आणि सातारा येथील निवासी उपजिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या मतदारसंघातील निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष तसेच सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. एकूण ४७२ मतदार मतदान करणार असून त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतींचे ३९६ तर जिल्हा परिषद मतदार ७६ आहेत.
मतदानासाठी सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण या उपविभागीय मुख्यालयांवर एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून २ जून रोजी अर्जांची छाननी होईल. ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

Spread the love
  • Related Posts

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

    आपलं फलटण ( वृत्तसेवा )सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फलटण येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. केंद्रावर नोंद असलेल्या सर्व ३१ मतदारांनी…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!