फलटण : आपलं फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने रविवार, दि. ११ ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबरदरम्यान माळजाई मंदिर परिसरात नवरात्र व दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात धार्मिक विधींसह भजन, दांडिया, गरबा, श्री सूक्त पठण, महाभोंडला आणि विविध महिला स्पर्धांची रेलचेल असणार आहे.
महोत्सवाची सुरुवात आज, रविवारी सकाळी ७ वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण यांच्या दुर्गामाता दौडीच्या स्वागत व ध्वजपूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता घटस्थापना, सकाळी ८ वाजता देवीचा अभिषेक आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती होईल.
सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपासून गुरुवार, दि. १५ ऑक्टोबरपर्यंत दररोज देवीचा अभिषेक व महाआरती होणार असून, दुपारी ४ ते ६ या वेळेत अनुक्रमे सरस्वती, शारदा, केशव स्मृती आणि सिद्धिविनायक महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ओपन दांडिया व गरबा रंगणार आहे. शनिवार, दि. १७ रोजी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण केंद्र यांच्या सौजन्याने श्री सूक्त पठण व महाभोंडला होईल. रविवार, दि. १८ रोजी रक्षक रयतेचा न्यूज व महिला मंच यांच्या वतीने भोंडला, उपवासाच्या फराळाची स्पर्धा आणि नवरंग साडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी श्री. शिवाजीराव शिंदे परिवार यांच्या सौजन्याने सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होमहवन होणार आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पारंपरिक दसरा महोत्सवाने या दहा दिवसीय उत्सवाची सांगता होईल.
माळजाई मंदिरातील या महोत्सवामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने फलटणमधील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला उत्सवी रंग चढणार आहे. भाविक, नागरिक आणि महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…






