प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ६ ऑक्टोबरला विशेष सत्कार सोहळा

आपलं फलटण: जनसेवेला समर्पित प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यासाठी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि. ६ ऑक्टोबर रोजी सुरवडी येथील रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. हा सोहळा होणार असून, त्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,आमदार महेश शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार मदन भोसले, आनंदराव नाना पाटील, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी जि. प./ प. स. सदस्य यांच्यासह राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ वाटचालीत पदापेक्षा माणुसकी आणि जनसेवेला प्राधान्य दिले. गरिबांच्या अश्रूंना आधार देत समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याची विविध स्तरांतून दखल घेण्यात आली आहे.
संघर्ष, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हीच त्यांच्या ७५ वर्षांच्या जीवनप्रवासाची मोठी कमाई मानली जात आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित हा सत्कार सोहळा त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरणार आहे.
या गौरव सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नगराध्यक्ष समशेर सिंह अनेक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले व पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांनी केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!