बनावट आधारकार्ड व कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीर वास्तव्य; बांगलादेशी महिलेला दोन वर्षांचा कारावास फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपासानंतर न्यायालयाचा निकाल; परकीय नागरिक कायद्यानुसार शिक्षा

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी महिलेला फलटण येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे बेकायदेशीर वास्तव्याच्या प्रकरणात महत्त्वाची कारवाई झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी महिला अंजला शारदाद खातून ऊर्फ सलमा अक्रतारसदान ऊर्फ सलमा हाजीर शेख (वय ३३, मूळ रा. जिरानगासा, रामपूर, शरशा, जशोरे, बांगलादेश) ही बनावट आधारकार्ड व कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दि. ८ मे २०२५ रोजी फलटण तालुक्यातील भिलकटी गावच्या हद्दीतील १८ फाटा परिसरात ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६७/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच परकीय नागरिक कायदा व पारपत्र अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीविरुद्ध सबळ पुरावा निष्पन्न झाल्याने न्यायालयाने तिला दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस कर्मचारी अमोल देशमुख यांनी सहकार्य केले, तर सरकारी अभियोक्ता अॅड. बांदल मॅडम यांनी न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजात महिला पोलीस हवालदार वैशाली नेवसे यांनी मदत केली.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!