विद्यार्थ्यांच्या हातून साकारल्या १०० गणेशमूर्ती!मुधोजी हायस्कूलमध्ये शाडू मातीची कार्यशाळा; पर्यावरण जबाबदारी’चा संदेश

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : गणेशोत्सवाची भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या उपक्रमात १०० विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारत आगामी गणेशोत्सवात याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला.
प्रसिद्ध मूर्तिकार राजेश बोथेकर, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर व विजय पाटील यांच्या उपस्थितीत हा उपक्रम झाला. गेल्या सहा वर्षांपासून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी आणि मूर्तिकार राजेश बोथेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मूर्ती घडविण्याचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने शाडूची माती हाताळत विविध आकारांच्या सुबक गणेशमूर्ती तयार केल्या. स्वतःच्या हाताने घडविलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरणार असून, त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही घराघरात पोहोचणार आहे.
यावेळी प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार होणे गरजेचे आहे. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून पर्यावरणाविषयी सामाजिक जाणीवही निर्माण होत आहे.
पर्यवेक्षक विजय पाटील म्हणाले की, शाडूच्या मातीच्या मूर्तींच्या वापरामुळे विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण कमी करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मूर्तींमधून समाजाला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा सकारात्मक संदेश मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव सूर्यवंशी व चेतन बोबडे यांनी केले. आभार पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर यांनी मानले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!