फलटण: आपलं फलटण :ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारती जिल्हा समिती, सातारा यांच्या वतीने नवोदित व महाविद्यालयीन लेखकांसाठी कथालेखन व कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सातारा येथील शाहू सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.
कथा कशी सुचते, तिची सर्जनशील उभारणी कशी करावी, कथेचा आकृतीबंध, व्यक्तिरेखा व प्रसंगांची मांडणी तसेच लिहिलेली कथा प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत कशी पोहोचवावी, याबाबत सहभागी लेखकांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक मिळणार आहे.
या कार्यशाळेत सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि लेखक-अभिनेते प्रमोद पवार मार्गदर्शन करणार आहेत. लेखन, अभिनय, रंगभूमी आणि दिग्दर्शनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या मान्यवरांकडून मिळणारे अनुभवाधारित मार्गदर्शन नवोदित लेखकांसाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे.
कथालेखनाची आवड असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नवोदित लेखकांना आपल्या लेखनाला योग्य दिशा देण्याची आणि कथाकथनाच्या माध्यमातून आत्मविश्वासाने ते सादर करण्याची संधी या कार्यशाळेत मिळणार आहे. साहित्य क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या साहित्यप्रेमींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यशाळेसाठी प्रति व्यक्ती १०० रुपये प्रवेश शुल्क असून, इच्छुकांनी दि. २७ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी मुकुंद फडके (९५५२५९३२९७), संजीव आरेकर (८१४९९१२६८७), दिलीप चरेगावकर (९९२१९५८०४२) व रसिका केसकर (९४२०६३०३७४) यांच्याशी संपर्क साधावा.
साहित्यप्रेमी, नवोदित लेखक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कथाकथनाची आवड असणाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले आहे.
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…






