अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत कृषीदूतांकडून बँक कर्ज प्रस्तावाबाबत मार्गदर्शन शाश्वत शेतीसाठी आर्थिक नियोजन, प्रकल्प अहवाल व कर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती

फलटण आपलं फलटण प्रतिनिधी :

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत विठ्ठलवाडी येथे कृषीदूतांनी यजमान शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शाश्वत शेती व्यवसायासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी कृषीदूतांनी बँक प्रकल्प अहवाल तयार करताना आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली. शेतीचे अंदाजपत्रक, संभाव्य उत्पन्न, खर्च व नफा, आवश्यक साधनसामग्री, मशागतीचे नियोजन तसेच कर्जफेडीचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
बँकेकडून कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक व आर्थिक निकषांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, कृषी यंत्रसामग्री, पशुपालन, फळबाग तसेच प्रक्रिया उद्योगासाठी बँकेचे कर्ज मिळविण्यास पात्र ठरू शकतात, असे कृषीदूतांनी सांगितले.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक व विषय अध्यापक प्रा. नीतीषा पंडित तसेच कार्यक्रम समन्वयक सौ. नीलिमा धालपे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात कृषीदूत साहिल आतकिरे, ओंकार गारगोटे, तुषार ठेंगल, वैभवराज सुरवसे, सोहम गरड, धीरज पाटील आणि सुमित शितोळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!