आपलं फलटण प्रतिनिधी : राजाळे तालुका फलटण येथे सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजाळे शाखेचा शुभारंभ सोहळा आज रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. सुयोग रामराव लेंभे (एम.डी.), आशीर्वाद हॉस्पिटल, वाठार स्टेशन यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयंवतराव भोसले (साहेब) उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, सेवकवृंद, सभासद, ग्रामस्थ तसेच मान्यवर उपस्थित राहणार असून, परिसरातील नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
राजाळे परिसरातील नागरिकांना आर्थिक सेवा अधिक सुलभ, गतिमान व विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.






