विठ्ठलवाडीत कृषीदूतांकडून धान्य साठवणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन; किडींपासून संरक्षणाचे आवाहन

आपलं फलटण प्रतिनिधी : पावसाळ्याची चाहूल लागत असताना घरामध्ये साठवून ठेवलेल्या धान्याचे विविध किडींपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत विठ्ठलवाडी येथे कृषीदूतांनी शेतकऱ्यांना धान्य साठवणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून धान्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासह आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
धान्य साठवणुकीदरम्यान सोंडे कीड (राईस वीव्हील), लेसर ग्रेन बोरर, कॉरसायरा पतंग आणि खापरा भुंगा यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडी धान्याच्या आत शिरून ते पोखरतात. परिणामी धान्याचे वजन कमी होते, उगवणक्षमता घटते तसेच पौष्टिक मूल्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे साठवणीपूर्वी धान्य व्यवस्थित वाळवून स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी साठवण्याचे आवाहन कृषीदूतांनी केले.
यावेळी शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि घरच्या घरी करता येणाऱ्या धान्य संरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कृषीदूतांच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
हा उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय फलटण यांच्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्पांतर्गत राबविण्यात आला. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नीतिशा पंडित तसेच विशेष मार्गदर्शक प्रा. माधुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे व तुषार ठेंगल यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला.
चौकट
धान्य साठवताना घ्या ही काळजी
धान्य पूर्णपणे वाळवूनच साठवावे.
कोरड्या व स्वच्छ ठिकाणी साठवणूक करावी.
पोत्यांची नियमित तपासणी करावी.
किडींचा प्रादुर्भाव दिसताच तातडीने नियंत्रण उपाययोजना कराव्यात.
बियाणे म्हणून वापरावयाचे धान्य स्वतंत्र ठेवावे.

Spread the love
  • Related Posts

    माझेरीत कै. सचिन प्रकाश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    आपलंफलटण प्रतिनिधी: माझेरी पुनर्वसित (ता. फलटण )येथील युवा कार्यकर्ते कै. सचिन प्रकाश दिघे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता फुलांचा…

    Spread the love

    कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा आणि अन्न व औषध प्रशासनाचा संयुक्त बडगा फलटण( पुढारी वृत्तसेवा ) शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीविरोधात फलटण शहर पोलिस…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    माझेरीत कै. सचिन प्रकाश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    माझेरीत कै. सचिन प्रकाश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

    सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

    तब्बल 38 वर्षांनी पुन्हा भरला मैत्रीचा दरबार; हनुमान विद्यालय शिंदेवाडीच्या 1986-87 बॅचचा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात

    तब्बल 38 वर्षांनी पुन्हा भरला मैत्रीचा दरबार; हनुमान विद्यालय शिंदेवाडीच्या 1986-87 बॅचचा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करा : हरिश पाटणे‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना शासकीय अधिस्वीकृती पत्रिका प्रदान

    वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करा : हरिश पाटणे‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना शासकीय अधिस्वीकृती पत्रिका प्रदान
    error: Content is protected !!