स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

आपलं फलटण : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत विठ्ठलवाडी येथे गोठ्याची व प्राण्यांच्या निवाराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याविषयी प्रात्यक्षिकासह जनजागृती केली.
यावेळी कृषीदूतांनी शेतकऱ्यांना गोठ्यातील कचरा व विष्ठा नियमितपणे साफ करण्याचे महत्त्व पटवून दिले. जनावरांच्या वापरातील जागा स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करणे, गोठ्यात खेळती हवा राहील याची काळजी घेणे तसेच पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छ व निर्जंतुक गोठ्यामुळे जनावरांमध्ये रोगांचा प्रसार कमी होतो, दूध उत्पादनाची गुणवत्ता सुधारते तसेच विविध संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण होते, अशी माहिती कृषीदूतांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे तसेच पशुपालन व दुग्धशास्त्र विषय मार्गदर्शक प्रा. एस. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यावेळी कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे व तुषार ठेंगल यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले.
“स्वच्छ गोठा हीच निरोगी पशुधनाची गुरुकिल्ली असून, शाश्वत दुग्धव्यवसायासाठी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला पर्याय नाही,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Spread the love
  • Related Posts

    माझेरीत कै. सचिन प्रकाश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    आपलंफलटण प्रतिनिधी: माझेरी पुनर्वसित (ता. फलटण )येथील युवा कार्यकर्ते कै. सचिन प्रकाश दिघे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता फुलांचा…

    Spread the love

    कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा आणि अन्न व औषध प्रशासनाचा संयुक्त बडगा फलटण( पुढारी वृत्तसेवा ) शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीविरोधात फलटण शहर पोलिस…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    माझेरीत कै. सचिन प्रकाश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    माझेरीत कै. सचिन प्रकाश दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    कोळकीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; 41 हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

    सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

    तब्बल 38 वर्षांनी पुन्हा भरला मैत्रीचा दरबार; हनुमान विद्यालय शिंदेवाडीच्या 1986-87 बॅचचा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात

    तब्बल 38 वर्षांनी पुन्हा भरला मैत्रीचा दरबार; हनुमान विद्यालय शिंदेवाडीच्या 1986-87 बॅचचा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करा : हरिश पाटणे‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना शासकीय अधिस्वीकृती पत्रिका प्रदान

    वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करा : हरिश पाटणे‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना शासकीय अधिस्वीकृती पत्रिका प्रदान
    error: Content is protected !!