दलित वस्तीत सांडपाण्याचे साम्राज्य; निरगुडी ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांचा संताप

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)
निरगुडी येथील महात्मा फुले नगर परिसरातील होलार समाज व बौद्ध वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संपूर्ण गावातील सांडपाणी दलित वस्तीतील भूयारी गटारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर परिसरात पावसाचे व सांडपाण्याचे पाणी घरांमध्ये घुसू नये यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले. मात्र, हे काम सुरू असतानाच गटारातून येणाऱ्या सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करण्याबाबत ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिणामी, गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले असून परिसरात उग्र दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी सिमेंट पाईप टाकून निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनाला वारंवार सूचना करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, “निरगुडी ग्रामपंचायत अजून किती दिवस दलित वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत राहणार?” असा संतप्त सवाल परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!