१५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

फलटण (आपलं फलटण) राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील सुमारे १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया या कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात केलेल्या सुधारणांनुसार नागरिकांच्या मागासवर्गासाठी आरक्षणाची मर्यादा २७ टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आली असून एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचाही या प्रक्रियेत विचार करण्यात आला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
०८/०६/२०२६ (सोमवार) : विशेष ग्रामसभेची सूचना देऊन आरक्षणाची सोडत काढण्याची कार्यवाही.
१२/०६/२०२६ (शुक्रवार) : विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढणे. (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चिती)
१७/०६/२०२६ (बुधवार) : प्रभागनिहाय आरक्षण प्राप्त अहवालाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता.
१९/०६/२०२६ (शुक्रवार) : प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप प्रसिद्ध करणे.
१९/०६/२०२६ ते २५/०६/२०२६ : आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी.
०३/०७/२०२६ (शुक्रवार) : प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अभिप्राय देणे.
०८/०७/२०२६ (बुधवार) : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावर अंतिम अहवालाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता.
१०/०७/२०२६ (शुक्रवार) : जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेला अंतिम आरक्षण आराखडा व्यापक
प्रसिद्धीस देणे.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!