मुधोजी हायस्कूलचा दहावीला उज्ज्वल निकाल; ९३.७२ टक्के यशमुलींची सरशी : जान्हवी लांडगे व सई शिंदे संयुक्त प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल ९३.७२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या निकालात विशेषतः मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम तीन क्रमांकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेस विद्यालयातून एकूण ७३३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल ६८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवत्तेच्या दृष्टीनेही विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले असून  विशेष श्रेणी १८५, प्रथम श्रेणी२६०, १७९  द्वितीय श्रेणी१७९ तर उत्तीर्ण श्रेणीत ६३ विद्यार्थी यशस्वी झाले.
विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु. जान्हवी हंबीर लांडगे व कु. सई रामदास शिंदे यांनी संयुक्तपणे पटकाविला. दोघींनाही ५०० पैकी ४८२ गुण मिळाले असून त्यांची टक्केवारी ९६.४० इतकी आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
द्वितीय क्रमांक कु. वेदांतिका विकास कणसे-पाटील  ९४.४० टक्के गुणांसह पटकाविला. तर कु. श्रेया नितीन कदम हिने  ९३.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्येही उत्कृष्ट गुणवत्ता दाखवून आपली शैक्षणिक क्षमता अधोरेखित केली.
संस्कृत व गणित विषयात शतप्रतिशत गुणांची चमक
विद्यालयातील कु. सई रामदास शिंदे हिने संस्कृत विषयात १००  तसेच गणित विषयात आर्यन रूपचंद शिंदे, आदित्य संदीप बोडके आणि मयंक स्वप्निल दोशी या विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळवत दैदिप्यमान कामगिरी केली. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल  आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे, प्राचार्य वसंतराव शेडगे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य ए. वाय. ननवरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक रावसाहेब निंबाळकर, राजेंद्र नाळे, पर्यवेक्षिका पूजा पाटील, संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    माझेरी पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आपलं फलटण ( वृत्तसेवा ) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल,…

    Spread the love

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    आपलं फलटण: प्रतिनिधीबहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!