उंब्रज (आपलं फलटण प्रतिनिधी) कराड तालुक्यातील कृष्णा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव जाधव विद्यालय उंब्रज विद्यालयाचा इयत्ता दहावी फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेचा निकाल ९६.४० टक्के लागला असून सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल लागल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप पडली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये धनश्री उद्धव लोहकरे हिने ८२ टक्के प्रथम क्रमांक शुभम शंकर शिंदे याने ७६ टक्के द्वितीय . संयमी अजित ढवळे, वेदांत तुकाराम जाधव व मुहम्मद अख्तर जमादार यांनी ७३.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक तसेच गौरी सचिन वाघमारे हिने ७२ टक्के गुण प्राप्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महादेव नानासो घाडगे हर्षवर्धन जाधव, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील निकम, वर्गशिक्षक दिलीप कांबळे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.







