दहिवडीत सोमवारी सोमनाथ मिंड (सर) यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न होणार; मान्यवरांची उपस्थिती​

दहिवडी ( आपलं फलटण प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक सोमनाथ भगवानराव मिंड हे ३१ मे २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या ३०-३५ वर्षांच्या समर्पित, निष्कलंक आणि आदर्श शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव करण्यासाठी सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात भव्य ‘सेवापूर्ती गौरव सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.​सोमनाथ मिंड सरांनी आपल्या कार्यकाळात केवळ अध्यापनच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरले आहे. याच कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दहिवडी परिसरातील ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी व शालेय सहकारी मित्रपरिवार सज्ज झाले आहेत.​या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर बबन शिवदास खाडे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.​याप्रसंगी अन्य मान्यवरांची मांदियाळीही जमणार असून, यामध्ये छत्रपती शाहू हायस्कूल बारामतीचे प्राचार्य गणपतराव तावरे, माण पं. स.चे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणजी पिसे, रयतचे सहविभाग अधिकारी दिनेश दाभाडे, कोरेगाव येथील डी.पी. भोसले कॉलेजचे प्रा. डॉ. अनिल दडस, रयतचे लाईफ मेंबर अर्जुन मलगुंडे, बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, विखळे येथील कमळेश्वर विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक पोपटराव मिंड, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य लालासाहेब ढवाण, सुरेंद्र मोरे आणि श्रीमती रेखाताई जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहून सरांच्या कार्याचा गौरव करणार आहेत.​सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य एन. एस. दोरगे, पर्यवेक्षक बी. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक स्कूल कमिटी, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थांनी केले आहे. या प्रेरणादायी सोहळ्यास परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी , हितचिंतक व निमंत्रकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    माझेरी पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आपलं फलटण ( वृत्तसेवा ) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल,…

    Spread the love

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    आपलं फलटण: प्रतिनिधीबहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!