विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला

विडणी (आपलं फलटण प्रतिनिधी) :
महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विडणी (ता. फलटण) येथे विविध कार्यक्रमांनी जल्लोषमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. संघमित्र तरुण मंडळ (बौद्धनगर) यांच्या पुढाकारातून आयोजित उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जयंतीनिमित्त विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा तसेच गेम शो यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. याचबरोबर अंगणवाडी शाळांमध्ये फळे व अल्पोपहाराचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
मंगळवार (दि. १४ एप्रिल) रोजी मध्यरात्री १२ वाजता तक्षशिला बुद्धविहारात सामुदायिक बुद्धपूजा व भिमस्तुतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला. सकाळी ९ वाजता तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून खीरदानाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व अनुयायी उपस्थित होते.
यानंतर बौद्धनगर ते फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सायंकाळी ७ वाजता तथागत गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पांढऱ्या वेशात सहभागी झालेल्या उपासक-उपासिका, युवक-युवती व नागरिकांनी मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. भिमगीतांच्या गजरात व घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.
दरम्यान, जयंतीनिमित्त गावातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, उत्तरेश्वर हायस्कूल तसेच अंगणवाडी केंद्रांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघमित्र तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    ग्राम सुरक्षा यंत्रणेला निधीअभावी कुलूप; ३० जूनपासून सेवा बंदसातारा जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाख ग्रामस्थांवर परिणाम; आपत्कालीन सूचना व्यवस्थेवर संकट

    फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी )ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे संदेश तात्काळ पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा निधीअभावी येत्या…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!