उपसभापती अमोल सस्ते यांचा पदग्रहण सोहळा जल्लोषात; सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्याची ग्वाही

फलटण( आपलं फलटण )फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झालेले शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे अमोल सस्ते यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनियुक्त उपसभापतींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सभागृहात शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती. वातावरणात उत्साहाचे आणि आनंदाचे चित्र दिसून आले.
पदग्रहणानंतर आपल्या मनोगतात अमोल सस्ते यांनी उपस्थितांचे आभार मानत, पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देत, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्याला माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  संजीवराजे ना.निंबाळकर, नगरसेवक  अनिकेतराजे ना. निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी नवनियुक्त उपसभापतींना शुभेच्छा देत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!