शांत फलटणसाठी पोलिसांचा पुढाकार; बेशिस्त रॅलींना लगाम घालण्यासाठी ठोस कारवाईची भूमिका

कायद्याचे राज्य आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे सरसावले; नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

फलटण : (आपलं फलटण ) शांतताप्रिय फलटण शहरातील सार्वजनिक शांतता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी फलटण पोलिसांनी बेशिस्तपणे काढण्यात येणाऱ्या वाहन रॅली आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रकारांविरोधात ठोस भूमिका घेतली आहे. शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने विनापरवाना वाहनांची रॅली काढून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, वाहनांचे सायलेन्सर मोठ्या आवाजात वाजविणे तसेच भरधाव वेगाने वाहने चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याच्या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. शांत फलटणची ओळख कायम राखण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत होणे अपेक्षित आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी सोमवार पेठ, फलटण येथे २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत एका वाढदिवसानिमित्त सुमारे ३० ते ४० जणांनी काळ्या रंगाची थार व अन्य चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह शहरात रॅली काढल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश लागू असतानाही जमाव जमवून विनापरवाना रॅली काढणे, सार्वजनिक रस्त्यावर वाहने थांबवून गर्दी करणे, आरडाओरडा करणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजविणे आणि दुचाकींची धोकादायक पद्धतीने वेगाची स्पर्धा लावणे, असे प्रकार घडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रथम खबर रजिस्टर क्रमांक ४२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र विद्रूपीकरण प्रतिबंधक अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श कुंचीकरवे व रॅलीत सहभागी असलेल्या अन्य ३० ते ४० अज्ञात व्यक्तींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला आहे. शक्यतो सोशल मीडियावर व्यक्त होत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी फलटण शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सन्माननीय नागरिकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी फलटणमध्ये घडत नसल्याचे अनेकांनी आपल्याला सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे शहरातील वानवडी येथे डीवायएसपी तथा एसीपी म्हणून दोन वर्षे काम करताना अशा प्रकारांकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात गंभीर परिणाम उद्भवू शकतात, असा अनुभव आल्याचे गोडसे यांनी सांगितले. त्यामुळे फलटण शहर शांत राहावे, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, या उद्देशाने गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील रॅलीमध्ये सहभागी असलेल्या दुचाकींचे क्रमांक, चालकांची नावे अथवा अन्य माहिती नागरिकांकडे उपलब्ध असल्यास ती पोलिसांना कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले आहे. शहराच्या शांततेसाठी पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वाढदिवस साजरा करणे, आनंद व्यक्त करणे किंवा मित्रपरिवारासोबत एकत्र येणे याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, स्वतःचा आनंद साजरा करताना इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे, सार्वजनिक रस्ते अडविणे, ध्वनिप्रदूषण करणे आणि कायद्याचे उल्लंघन करणे हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.

फलटण शहराची शांतताप्रिय ओळख टिकविण्यासाठी पोलिसांनी घेतलेली भूमिका ही केवळ एका घटनेपुरती मर्यादित न राहता सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविणाऱ्या सर्व प्रकारांबाबत सातत्यपूर्ण असणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई, वाहनांची तपासणी, विनापरवाना रॅलींवर नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल अशा उपाययोजनांमधून प्रतिबंधात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.

उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घेतलेला पुढाकार आणि नागरिकांना दिलेले सहकार्याचे आवाहन निश्चितच महत्त्वाचे आहे. पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करावी आणि नागरिकांनीही जबाबदारपणे वागून त्यांना सहकार्य करावे. कारण शहराची शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा ही सामूहिक जबाबदारी आहे. चुकीच्या प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला, तरच शांत फलटणचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जपता येईल.

Spread the love
  • Related Posts

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटण : आपलं फलटण :थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य…

    Spread the love

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    फलटण : आपलं फलटण :विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फलटण येथे ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार!                   ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी! अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी!                        अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    आर्थिक शिस्त, काटकसरीचे व्यवस्थापन अन् दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच श्रीराम पतसंस्थेची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल!संस्थेने उत्तम तरलता राखत ठेवीदारांचा विश्वास जपला; काकासाहेब कोयटे यांचे गौरवोद्गार; संस्थापक डॉ. शिवाजीराव गावडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक

    error: Content is protected !!