फलटण: आपलं फलटण : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (दि. ३१) ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यापासून दौडीला सुरुवात झाली. प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, अकॅडमीचे विद्यार्थी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुता टिकविण्याची शपथ देण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, वाहतूक नियमांचे पालन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेसोबतच सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.






