फलटणमध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञानाचा महाकुंभ; ५४४ संघांचा सहभाग!इनोव्हेशन २के२६ व हॅकाथॉन २के२६ स्पर्धा ३ व ४ नोव्हेंबरला; अभियांत्रिकी विभागासाठी १ लाख २१ हजारांचे प्रथम पारितोषिक, हॅकाथॉन विजेत्याला १ लाख

फलटण: आपलं फलटण :

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला राष्ट्रीय व्यासपीठ, नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि संशोधनवृत्तीला चालना देणारा राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव फलटणमध्ये ३ व ४ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘इनोव्हेशन २के२६’ आणि ‘हॅकाथॉन २के२६’ या दोन स्पर्धांसाठी देशातील पाचपेक्षा अधिक राज्यांतून तब्बल ५४४ संघांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
या महोत्सवाची माहिती देण्यासाठी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी माहिती दिली. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा, गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावाही यावेळी मांडण्यात आला.
‘इनोव्हेशन २के२६’ ही राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा असून त्यासाठी ३९९ संघांनी, तर संगणक संकेतलेखन आणि समस्या निराकरण कौशल्यांची कसोटी पाहणाऱ्या ‘हॅकाथॉन २के२६’साठी १४५ संघांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात आदी राज्यांतील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करणे, तांत्रिक संकल्पना प्रत्यक्षात आणणे आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची संधी या स्पर्धांमधून मिळणार आहे.
लाखोंची पारितोषिके; गुणवत्तेला प्रोत्साहन
इनोव्हेशन २के२६ मधील अभियांत्रिकी विभागासाठी प्रथम क्रमांकाचे १ लाख २१ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाचे ६१ हजार रुपये पारितोषिक आहे. पॉलिटेक्निक विभागात प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार, तर द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येकी पाच हजार रुपयांची दहा अतिरिक्त पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. हॅकाथॉन २के२६ मध्ये प्रथम क्रमांकासाठी एक लाख, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची सहा अतिरिक्त पारितोषिके दिली जाणार आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून स्पर्धांना प्रारंभ होणार असून सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होईल. दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.
सोसायटीचे नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. मनोजकुमार व्ही. दळवी हे संयोजक असून इनोव्हेशन स्पर्धेची जबाबदारी प्रा. गोविंद ठोंबरे, प्रा. नितीन भुजबळ, प्रा. इंदिरा ठाकूर व प्रा. स्वप्नाली पिसाळ, तर हॅकाथॉनची जबाबदारी प्रा. किरण समगीर व प्रा. रुजल दोशी सांभाळत आहेत.
महाविद्यालयाच्या श्रीमंत शिवाजीराजेनगर, कुरवली रोड, ठाकूरकी, फलटण येथील परिसरात या स्पर्धा होणार आहेत. अधिक माहितीसाठी www.coephaltan.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेपूर्वी महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व कंपन्यांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रा. शांताराम काळेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Spread the love
  • Related Posts

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटण : आपलं फलटण :थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य…

    Spread the love

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    फलटण : आपलं फलटण :विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फलटण येथे ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार!                   ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी! अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी!                        अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    आर्थिक शिस्त, काटकसरीचे व्यवस्थापन अन् दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच श्रीराम पतसंस्थेची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल!संस्थेने उत्तम तरलता राखत ठेवीदारांचा विश्वास जपला; काकासाहेब कोयटे यांचे गौरवोद्गार; संस्थापक डॉ. शिवाजीराव गावडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक

    error: Content is protected !!