फलटण: आपलं फलटण
23 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या पुणे विभाग विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी फलटण तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून सर्व आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. निवडणुकीच्या सुरळीत आयोजनासाठी तालुक्यात एकूण १२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, वाचकांच्या सोयीसाठी पहिले ८ केंद्र पदवीधर मतदारसंघासाठी तर उर्वरित ४ केंद्र शिक्षक मतदारसंघासाठी अशा क्रमाने नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातून पदवीधर मतदारसंघासाठी ४,९०० आणि शिक्षक मतदारसंघासाठी ९८६ असे एकूण ५,८८६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्या ८ केंद्रांपैकी मतदान
केंद्र क्र. १ (भाग क्र. २८२) हे सौ. वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव उत्तर बाजू खोली क्र. ३ येथे असून, येथे एकूण ६८३ मतदार (४२२ पुरुष, २६१ महिला) मतदान करतील. या केंद्रात तरडगाव, विठ्ठलवाडी, कापडगाव, कोरेगाव, तांबवे, चांबारवाडी, सालपे, कोपरडे, कुसुर, शिंदेमळा, मिरेवाडी, माळेवाडी, पाडेगाव, आरडगाव, चव्हाणवाडी, होळ, साखरवाडी (पिंपळवाडी), खामगाव, मुरुम, सुरवडी, खराडेवाडी, तडवळे, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, काळज, डोबाळवाडी आणि जिंती या गावांतील मतदारांचा समावेश आहे.
फलटण शहर, मलठण, सरस्तेवाडी, चौधरीवाडी, खुंटे, शिंदेवाडी, निंभोरे, ढवळेवाडी, वडजल, काशीदवाडी, फडतरवाडी,भिलकटी, कोळकी, जाधववाडी, झिरपवाडी, फरांदवाडी व ठाकुरकी या परिसरासाठी मुधोजी हायस्कूल फलटण येथे तीन केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मतदान केंद्र क्र. २ (भाग क्र. २८३ – किशोरसिंह विभाग खोली क्र. ३२) येथे ६७१ मतदार (३८९ पुरुष, २८२ महिला), मतदान केंद्र क्र. ३ (भाग क्र. २८४ – मालोजीराजे विभाग खोली क्र. ८) येथे ६६७ मतदार (३८७ पुरुष, २८० महिला), तर मतदान केंद्र क्र. ४ (भाग क्र. २८५ – व्यंकटेश विभाग खोली क्र. २९) येथे ६८३ मतदार (४०४ पुरुष, २७९ महिला) आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
वाठार निंबाळकर, वाखरी, ढवळ, शेरीचीवाडी, पिराचीवाडी, ताथवडा, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, नांदल, घाडगेमळा, मुळीकवाडी, मिरगाव, खडकी, मलवडी, गिरवी, घुमाळवाडी, बोडकेवाडी, निरगुडी, विचुर्णी, कुरवली खुर्द, तावडी, दालवडी, मांडवखडक, मिरेवाडी, उपळवे, तरडफ, वेळोशी, दर्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, वडले, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, दुधेबावी, तिरकवाडी, सासकल, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, कापशी, आळजापूर, बिबी, घाडगेवाडी, हिंगणगाव, शेरीचीवाडी हि., वाघोशी, वडगांव, कोर्हाळे, सासवड व टाकोबाईचीवाडी या गावांतील मतदारांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार निंबाळकर नवीन इमारतीमध्ये दोन केंद्र उभारण्यात आली आहेत. यात मतदान केंद्र क्र. ५ (भाग क्र. २८६ – दक्षिण बाजू खोली क्र. ३) मध्ये ४१९ मतदार (२८४ पुरुष, १३५ महिला) आणि मतदान केंद्र क्र. ६ (भाग क्र. २८७ – दक्षिण बाजू खोली क्र. ४) मध्ये ५६६ मतदार (३८२ पुरुष, १८४ महिला) मतदानासाठी पात्र असतील.
राजाळे, सोनगांव, सांगवी, सोमंथळी, कांबळेश्वर, विडणी, पिंप्रद, टाकळवाडे, धुळदेव, अलगुडेवाडी, आसू, पवारवाडी, ढवळेवाडी, हणमंतवाडी, शिंदेनगर, जाधववाडी तामखडा, गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे, साठे, सरडे, बरड, राजुरी, भवानीनगर, दत्तनगर, कुरवली बुद्रुक, जावली, आंदरुड, मुंजवडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोमबावाडी, निंबळक, मठाचीवाडी व वाजेगांव या परिसरासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक येथे दोन केंद्र आहेत. त्यापैकी मतदान केंद्र क्र. ७ (भाग क्र. २८८ – नवीन इमारत पूर्व बाजू खोली क्र. १) येथे ५९१ मतदार (४२२ पुरुष, १६९ महिला) आणि मतदान केंद्र क्र. ८ (भाग क्र. २८९ – नवीन इमारत पूर्व बाजू खोली क्र. २) येथे ६२० मतदार (४३९ पुरुष, १८१ महिला) मतदान करतील.
शिक्षकांसाठी उर्वरित चार केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून मतदान केंद्र क्र. ९ (भाग क्र. १५१) हे सौ. वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव पूर्व बाजू खोली क्र. १ येथे आहे. या केंद्रावर ९७ मतदार (६२ पुरुष, ३५ महिला) असून त्यात तरडगाव, विठ्ठलवाडी, कापडगाव, कोरगाव, तांबवे, चांदारवाडी, सालपे, कोपरडे, कुसुर, शिंदेमळा, मिरेवाडी, माळेवाडी, पाडेगाव, आरडगाव, चव्हाणवाडी, होळ, साखरवाडी (पिंपळवाडी), खामगाव, मुरुम, सुरवडी, खराडेवाडी, तडवले, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, काळज, डोबाळवाडी व जिंती या गावांतील शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
फलटण शहर, मलठण, सरस्तेवाडी, चौधरीवाडी, खुंटे, शिंदेवाडी, निंभोरे, ढवलेवाडी, वडजल, काशीदवाडी, फरंदवाडी, गिलकटी, कोळकी, जाधववाडी, झिरपवाडी, फरांदवाडी व ठाकुरकी परिसरासाठी मतदान केंद्र क्र. १० (भाग क्र. १५२ – मुधोजी हायस्कूल फलटण किशोरसिंह विभाग खोली क्र. ३४) निश्चित केले असून येथे ४८२ मतदार (२५१ पुरुष, २३१ महिला) मतदान करतील.
वाठार निंबाळकर, वाखरी, ढवळ, शेरीचीवाडी, पिराचीवाडी, ताथवडा, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, नांदल, घाडगेमळा, मुळीकवाडी, मिरगाव, खडकी, मलवडी, गिरवी, घुमाळवाडी, बोडकेवाडी, निरगुडी, विचुरणी, कुरवली खुर्द, तावडी, दालवडी, मांडवखडक, मिरेवाडी, उपळवे, तरडफ, वेळोशी, दर्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, वडले, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, दुधेबावी, तिरकवाडी, सासकल, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, आदर्की बुद्रुक व आदर्की खुर्द परिसरातील शिक्षक मतदारांसाठी मतदान केंद्र क्र. ११ (भाग क्र. १५३ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार निंबाळकर नवीन इमारत पश्चिम बाजू खोली क्र. १) हे केंद्र असून येथे १९२ मतदार (१२६ पुरुष, ६६ महिला) मतदानाचा हक्क बजावतील.
सर्वात शेवटी मतदान केंद्र क्र. १२ (भाग क्र. १५४ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक नवीन इमारत पूर्व बाजू खोली क्र. ३) हे केंद्र असून येथे २५१ मतदार (१५६ पुरुष, ९५ महिला) मतदानाचा हक्क बजावतील. या केंद्रात राजाळे, सोनगांव, सांगवी, सोमंथळी, कांबळेश्वर, विडणी, पिंप्रद, टाकळवाडे, धुळदेव, अलगुडेवाडी, आसू, पवारवाडी, ढवळेवाडी, हणमंतवाडी, शिंदेनगर, जाधववाडी तामखडा, गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे, साठे, सरडे, बरड, राजुरी, भवानीनगर, दत्तनगर, कुरवली बुद्रुक, जावली, आंदरुड, मुंजवडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोमबावाडी, निंबळक, मठाचीवाडी व वाजेगांव येथील शिक्षक समाविष्ट असतील. प्रशासकीय पातळीवर सर्व १२ केंद्रांवर शांततेत व पारदर्शकपणे मतदान पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत.
मतदानाची वेळ: सकाळी आठ ते चार






