महाराजा मल्टीस्टेटचा पारदर्शक कारभार; सभासदांच्या विश्वासातून प्रगतीची घोडदौड

आपलं फलटण : सभासदांचा विश्वास कायम जपत स्वच्छ, पारदर्शक आणि काटकसरीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळेच महाराजा मल्टीस्टेटच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सभासदांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, याच विश्वासाच्या बळावर संस्थेची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी केले.
महाराजा मल्टीस्टेटच्या सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड. सौ. मधुबाला भोसले, तुषार गांधी, सौ. प्रियदर्शनी भोसले, हेमंत फुले, हणमंत जगताप, विलास रसाळ, कुमार भट्टड, दीपराज तावरे, निलेश मोरे, अमोल सस्ते, सुभाष आढाव यांच्यासह संचालक व शाखा कार्यकारी समितीचे चेअरमन उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दिलीपसिंह भोसले, तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, कुमार भट्टड, विलास रसाळ यांच्यासह सर्व संचालक व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
दिलीपसिंह भोसले म्हणाले, संचालक मंडळाने संस्थेचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शकपणे केल्यामुळे महाराजा मल्टीस्टेटला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार तीन वेळा मिळाले आहेत. कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे. स्पर्धेच्या युगात सभासदांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे.
प्रास्ताविकात व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेतला. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला २ कोटी ३५ लाख ३ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सांगून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सभासदांना दिलेल्या शब्दानुसार संस्थेचे प्रधान कार्यालय अत्याधुनिक पद्धतीने सुरू करण्यात आले असून, भविष्यात मल्टीस्टेटचे रूपांतर मल्टीपर्पज संस्थेत करून विविध व्यवसायांसह हॉस्पिटल आणि स्कूल सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे सीईओ संदीप जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन करून सभेचे सूत्रसंचालन केले. संचालक निलेश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संचालक मंडळ, शाखा प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!