— निर्भीड पत्रकारिता, निस्वार्थ समाजकारण आणि जिव्हाळ्याच्या जनसंपर्काचा प्रेरणादायी प्रवास
स्वार्थी राजकारणाच्या प्रवाहात अनेकांनी जीवनातील मूल्यांना तिलांजली देत राजकीय यश मिळवले असेल; मात्र विचारांशी प्रामाणिक राहून, आई-वडिलांचे संस्कार जपत आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून आयुष्याची वाटचाल करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून फलटण शहरात साप्ताहिक ‘फलटण दर्शन’चे संपादक सुधीर तानाजी अहिवळे यांचे नाव आदराने घेतले जाते.
फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय तानाजी बाबुराव अहिवळे यांचे चिरंजीव असलेल्या सुधीर अहिवळे यांनी वडिलांकडून मिळालेला सामाजिक व राजकीय वारसा केवळ पुढे नेला नाही, तर आपल्या कार्यातून त्याला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची वृत्ती आणि अडचणीच्या काळात माणसाच्या मदतीला धावून जाण्याची तत्परता यामुळे ‘सुधीर चेअरमन’ हे नाव फलटण तालुक्यात आपुलकीने घेतले जाते.
राजकारण आणि समाजकारणाचा वसा त्यांनी वडील तानाजीराव तसेच मोठे बंधू आशिष अहिवळे यांच्याकडून घेतला. समाजकारणाच्या प्रवासात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. मित्र, सहकारी आणि कार्यकर्त्यांशी जपलेला सातत्यपूर्ण संपर्क ही त्यांची मोठी ताकद आहे. स्पष्टवक्तेपणा आणि न्यायाची भूमिका यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळे वजन प्राप्त झाले आहे.
फलटणच्या राजे घराण्याशी एकनिष्ठ राहून मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता या तिन्ही क्षेत्रांतील व्यापक जनसंपर्कामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.
‘जिथे अन्याय, तिथे चेअरमन सुधीर अहिवळे’ हे समीकरण त्यांच्या कार्यातून निर्माण झाले आहे. रोखठोक बोलण्याची शैली असली तरी प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा त्यांचा स्वभाव अनेकांच्या मनात घर करून आहे. संघर्षाच्या प्रसंगी स्पष्ट भूमिका आणि माणुसकीच्या प्रसंगी मदतीचा हात, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत.
अहिवळे कुटुंबालाही फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून समृद्ध सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांनी नगरसेविका म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे अहिवळे कुटुंबाची सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक दृढ झाली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही सुधीर अहिवळे यांनी दोन तपांहून अधिक काळ सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. साप्ताहिक ‘फलटण दर्शन’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली, सामान्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रश्नांवरही सातत्याने आवाज उठविला. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची त्यांची भूमिका अनेकदा ठामपणे दिसून आली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, हा केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नसून मूल्यांशी नाळ जोडलेल्या, माणुसकी जपणाऱ्या आणि समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या एका संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे.
‘सुधीर चेअरमन’ यांना वाढदिवसानिमित्त ‘आपलं फलटण’ परिवाराच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो. समाजकारण, राजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील आपली वाटचाल अधिक यशस्वी आणि प्रेरणादायी होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐🎂
— आपलं फलटण परिवाराकडून
वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐





