सचोटी, हातोटी आणि कसोटी’च्या बळावर यशस्वी व्हा; फलटण इंजिनिअरिंग कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा पुण्यात उत्साहातविद्यार्थ्यांच्या विश्वासामुळेच महाविद्यालयाला ‘स्वायत्त’ दर्जा; श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रतिपादन

आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित माजी विद्यार्थी मेळावा पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील जीएमके बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध बॅचमधील शेकडो माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देतानाच महाविद्यालयाच्या उज्ज्वल वाटचालीचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पूजा प्रिसिजन इंजिनिअरिंग लि., चाकणचे चेअरमन अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी बदलत्या औद्योगिक जगतातील संधी आणि आव्हानांचा वेध घेत विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीकडे न पाहता उद्योजकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. “जीवनात आणि व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सचोटी, हातोटी आणि कसोटी या त्रिसूत्रीवर खरे उतरावे लागते. या गुणांच्या बळावरच जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाला उजाळा दिला. “विद्यार्थी हेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर असतात. २०११ मध्ये महाविद्यालय सुरू झाले, त्यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी दाखविलेला विश्वास हीच आमची खरी ताकद ठरली. त्याच विश्वासाच्या बळावर आज हे महाविद्यालय ‘ए’ श्रेणी प्राप्त स्वायत्त संस्था म्हणून राज्यात नावारूपाला आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह सीडीसी सदस्य हेमंत रानडे, भोजराज नाईक-निंबाळकर, शिरीष दोशी, शिरीष भोसले, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यातील पहिले ‘ए’ श्रेणी (NAAC A Grade) प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच NBA मान्यतेसह गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपत संस्थेने अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय स्थान मिळविले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. अमरसिंह रणवरे यांनी आभार मानल्यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात मेळाव्याची सांगता झाली.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!