आपलं फलटण (वृत्तसेवा )वीर धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने आज (दि. ८) सायंकाळी ६ वाजल्यापासून निरा नदीपात्रात एकूण ६,०३७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वीर धरणाच्या सांडव्यावरून ४,६३७ क्युसेक्स तर एस्केपमधून १,४०० क्युसेक्स असा एकूण ६,०३७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी आवक लक्षात घेऊन विसर्गात पुढील काळात वाढ अथवा घट करण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नदीपात्रात कोणत्याही कारणासाठी उतरू नये, नदीकाठावर ठेवलेले साहित्य, शेतीची उपकरणे तसेच जनावरे तातडीने सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना तत्काळ सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी
आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…






