रामराजे उद्यान’ नामांतरास मंजुरी. अतिक्रमण हटवा, अन्यथा घरी बसा : नगराध्यक्षांचा अधिकाऱ्यांना इशारा

आपलं फलटण वृत्तसेवा : फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ‘रामराजे उद्यान’चे नामांतर, शहरातील अतिक्रमणे, मोकळ्या भूखंडांची स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सौम्या स्वरूपात खडाजंगी झाली. नगराध्यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर यांनी अतिक्रमण हटविण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील सभेपूर्वी कारवाई पूर्ण करा, अन्यथा ‘घरी बसण्याची तयारी ठेवा,’ असा थेट इशारा दिला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीसह २१ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील ‘रामराजे उद्यान’चे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ करण्याचा प्रस्ताव अशोक जाधव यांनी मांडला. सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी प्रस्तावाचे वाचन केले, तर किरण राऊत यांनी अनुमोदन दिले. यावेळी पांडुरंग गुंजवटे यांनी उद्यानाला माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र, हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नावाने अनेक खाजगी संस्था असून सरकारी उद्यानाला संत सगुणामाता यांचे नाव देण्यात गैर काहीच नसल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्षांनी नामांतराच्या भूमिकेचे समर्थन केले.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा नगरसेवक पंकज पवार यांनी उपस्थित करताच सभागृहाचे वातावरण तापले. अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाची उदासीनता पाहून नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पुढील सभेपूर्वी शहरातील अतिक्रमणे हटली नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेवरून विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अखेर संबंधित मालकांना नोटिसा बजावून स्वच्छता न केल्यास नगरपरिषद स्वतः स्वच्छता करून त्याचा खर्च मालमत्ता करात वसूल करेल, असा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्याच्या विषयावरही सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला.
सभेतील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे विरोधी गटाचे स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे मौन. यापूर्वी प्रत्येक विषयावर आक्रमक भूमिका घेणारे अनिकेतराजे यावेळी मात्र एकाही विषयावर बोलले नाहीत. विरोधी गटनेते पांडुरंग गुंजवटे उपस्थित असतानाही त्यांची शांत भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
सभेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दर्शन बारी, हिरकणी कक्ष, स्वच्छता आदी कामांसह १९ विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्यास मान्यता देण्यात आली.
याशिवाय अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान येथे निवारा शेड, कुरेशी नगरमधील विकासकामे, शहरातील २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करणे, जुने हातपंप दुरुस्त करणे, नवीन बोअरवेल घेणे, गोळीबार मैदान येथे पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे तसेच काळूबाई नगर येथील पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्णयही सभेत घेण्यात आले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!