सासकलमध्ये हुमणी कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाची मोहीम; प्रकाश सापळ्यांद्वारे भुंगेऱ्यांचा बंदोबस्त


आपलंफलटण: वृत्तसेवा
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने सासकल (ता. फलटण) येथे हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण मोहीम प्रभावीपणे राबविली. शेतकऱ्यांना वेळेत उपाययोजना करण्याचे आवाहन करत कृषी अधिकारी थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असल्याने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे व उपकृषी अधिकारी अजित सोनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सासकल येथील शेतकरी श्री. शिवाजी बुवासो झांजुर्णे यांच्या शेतात हुमणी कीड भुंगेरे नियंत्रणासाठी प्रकाश (लाईट) सापळा उभारून प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना हुमणी किडीच्या जीवनचक्राविषयी तसेच तिच्या प्रभावी नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीस जून-जुलै महिन्यात संध्याकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान बाभूळ, कडुनिंब व बोर आदी झाडांवर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमा होतात. या भुंगेऱ्यांना झाडांच्या फांद्या हलवून खाली पाडून रॉकेल मिश्रित पाण्यात गोळा करून नष्ट करावे, तसेच शेताजवळ प्रकाश सापळे लावून त्यांचे नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात आले.
हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचे वेळेत नियंत्रण झाल्यास अंडी घालण्याची प्रक्रिया रोखता येते. परिणामी अळ्यांची निर्मिती कमी होऊन पिकांच्या मुळांवर होणारा प्रादुर्भाव टाळता येतो. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होऊन उत्पादनवाढीस मदत होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
सासकल परिसरातील शेतकऱ्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या प्रमाणात प्रकाश सापळे उभारण्यास सुरुवात केली आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनांनुसार सामूहिक पातळीवर प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषी सेवारत्न तथा सहायक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी केले.
चौकट
हुमणी कीड नियंत्रण का महत्त्वाचे?
प्रौढ भुंगेऱ्यांचे नियंत्रण केल्यास अंडी घालण्याचे प्रमाण कमी होते.
अळ्यांचा प्रादुर्भाव रोखल्याने पिकांच्या मुळांचे संरक्षण होते.
ऊस, भुईमूग, सोयाबीन, बाजरीसह विविध पिकांचे नुकसान टाळता येते.
उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा कमी होण्यास मदत होते.
प्रकाश सापळे व सामूहिक नियंत्रण मोहीम हा सर्वाधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जातो.

Spread the love
  • Related Posts

    फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिकमहिलांना व विद्यार्थ्यांना बासुंदी निर्मितीतून उद्योजकतेचे धडे

    फलटण( आपलं फलटण ) श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत तसेच फलटण…

    Spread the love

    माळरानावर फुलवली आधुनिक फळबाग; सासकलच्या बबन मुळीक यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर

    फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतिशील फलोत्पादक शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रतिष्ठेच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!