बीज प्रक्रियेचे महत्त्व कृषीकन्यांनी पोहोचविले शेतकऱ्यांपर्यंत; फलटण कृषी महाविद्यालयाचा प्रात्यक्षिक उपक्रम

आपलं फलटण (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया विषयावरील प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करून आधुनिक शेतीतील महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिली.
यावेळी कृषीकन्यांनी बीज प्रक्रिया म्हणजे काय, तिचे महत्त्व आणि पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया का आवश्यक आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बियाण्यांना रोग, किडी व बुरशीजन्य प्रादुर्भावापासून संरक्षण मिळावे, उगवण क्षमता वाढावी तसेच पिकांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ व्हावी यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रात्यक्षिकादरम्यान जैविक व रासायनिक बीज प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती देण्यात आली. तसेच योग्य प्रमाण, वापरण्याची पद्धत आणि घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कृषी क्षेत्रात शाश्वत उत्पादनवाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण पीक घेण्यासाठी बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न विचारून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. नीतीषा पंडित तसेच वनस्पती रोग विज्ञान विषयाचे विशेष मार्गदर्शक प्रा. पी. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषीकन्या विद्या नवले, साक्षी नाझीरकर, श्रावणी भागवत, जोगेश्वरी लोकरे, अस्मिता नेवसे, मोनली कोळपे आणि गौरी जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिकमहिलांना व विद्यार्थ्यांना बासुंदी निर्मितीतून उद्योजकतेचे धडे

    फलटण( आपलं फलटण ) श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत तसेच फलटण…

    Spread the love

    माळरानावर फुलवली आधुनिक फळबाग; सासकलच्या बबन मुळीक यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर

    फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतिशील फलोत्पादक शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रतिष्ठेच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!