तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या यशस्वी शिष्टाईने दिव्यांगांचे उपोषण मागे

फलटण (आपलं फलटण )विविध  मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले दिव्यांग बांधवांचे बेमुदत उपोषण अखेर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले. तहसीलदारांच्या हस्ते सरबत देऊन आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते
      गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणादरम्यान दोन दिव्यांग बांधवांची प्रकृती खालावली होती. दरम्यान, प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या बहुतेक मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
    चर्चेदरम्यान संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती, दिव्यांग बांधवांच्या जागेच्या प्रश्नावर बैठक आयोजित करणे, दिव्यांगा बाबत सहानभोवतीची भूमिका न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना समज देणे, अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करणे तसेच रस्त्याच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत तोडगा काढल्याने उपोषणाची यशस्वी सांगता झाली.

Spread the love
  • Related Posts

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    आपलं फलटण : प्रतिनिधीफलटण येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ दिपक सावळा पवार यांना महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले असून त्यांच्या कार्यालयामार्फत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण १,५४५ दस्तऐवजांबाबत गंभीर अनियमिततेचा…

    Spread the love

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    आपलं फलटण: प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मोबाईल ॲप्लिकेशनचे प्रात्यक्षिक सादर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

    काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

    धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक

    धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक

    स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

    स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली
    error: Content is protected !!