फलटणमध्ये १२ ऑक्टोबरपासून आधुनिक बेकरी उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण केक, ब्रेड, बिस्किटे, पिझ्झा निर्मितीचे मिळणार प्रात्यक्षिक ज्ञान; स्वयंरोजगाराची संधी

फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी )बेकरी व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या युवक-युवतींसह महिला बचत गट आणि लघुउद्योजकांसाठी फलटण येथे आधुनिक बेकरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या वतीने दि. १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पाच दिवसीय प्रशिक्षण होणार आहे. इच्छुकांनी दि. १० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रशिक्षणात केक, ब्रेड, लादी पाव, बिस्किटे, कुकीज, खारी, टोस्ट आणि पिझ्झा बेस यांसह विविध बेकरी पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. कच्च्या मालाची निवड, यीस्टचा वापर, कणीक मळण्याचे तंत्र, बेकिंग प्रक्रिया, तापमान नियंत्रण आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकविण्याच्या पद्धतींची माहितीही देण्यात येणार आहे.
बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, उत्पादन खर्चाचे नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्री व्यवस्था याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच व्यवसायासाठी उपलब्ध शासकीय कर्ज योजना व अनुदानांची माहितीही दिली जाणार आहे. त्यामुळे स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

दहावी उत्तीर्णांसाठी प्रवेश; शुल्क पाच हजार रुपये
प्रशिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून, प्रवेश मर्यादित आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर २५ प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण शुल्क पाच हजार रुपये असून, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रशिक्षण होईल.
इच्छुकांनी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड, राजवाडा शाखा येथे खाते क्रमांक 8160010200721, आयएफएससी कोड YESB005MSBL या खात्यावर प्रशिक्षण शुल्क जमा करावे. शुल्क भरल्यानंतर त्याची स्क्रीनशॉट प्रत प्रशिक्षण प्रतिनिधींकडे पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. संजय आडत (मो. ९९७०२८०५२८), प्रा. गणेश शिंदे (मो. ९८६०२११४१५६) किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण (मो. ९६५७२१४८३८) यांच्याशी संपर्क साधावा.
महाविद्यालयाच्या मृदाशास्त्र व उद्यानविद्या विभागाच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. युवक-युवती, महिला बचत गट, कृषी पदवीधर आणि लघुउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!