हरविलेले ७१ मोबाईल पोलिसांनी शोधले; १२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल परतसीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी

आपलं फलटण : हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ७१ मोबाईल शोधून काढण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे. शोधण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सीईआयआर पोर्टलद्वारे मोबाईल शोधण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी प्राप्त तक्रारी सीईआयआर पोर्टलवर अपलोड करून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान अनेक मोबाईल सातारा जिल्ह्याबाहेर वापरले जात असल्याचे समोर आले. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही काही मोबाईल वापरले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईलधारकांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. काही मोबाईल प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले, तर काही मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पोलिसांकडे परत मिळविण्यात आले.
तक्रारदार लांबच्या ठिकाणी राहत असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात येणे शक्य नसलेल्या प्रकरणांत पोलिसांनी मोबाईल कुरिअरद्वारे पाठविण्याची सुविधाही केली. सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ७१ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्यांची अंदाजे बाजारातील किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, डी. बी. पथकावे, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, सीईआयआर पोर्टलचे काम पाहणारे श्रीनाथ कदम, पोलीस नितीन चतुरे, अमोल जगदाळे व हनुमंत दडस यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
हरविलेला मोबाईल परत मिळेल, अशी आशा सोडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या या तांत्रिक शोधमोहीमेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!