आपलं फलटण प्रतिनिधी मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झालेल्या फलटण तालुक्यातील तब्बल ८० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (भा.प्र.से.) यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
या नियुक्तीमुळे फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या हाती गेला आहे. विशेष म्हणजे, एका अधिकाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली असून, गावागावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रशासकीय कारभार या अधिकाऱ्यांना सांभाळावा लागणार आहे.
कोणाकडे किती ग्रामपंचायती?

श्री. ए.एस. गौड, विस्तार अधिकारी (कृषी) — १४ ग्रामपंचायती :
साखरवाडी (पिंपळवाडी), तांबवे, जाधववाडी (फ), कापडगाव, खामगाव, हिंगणगाव, खराडेवाडी, तडवळे, मुरुम, आरडगाव, काळज, राजाळे, शेरेचीवाडी (हिं.), डोबाळवाडी.

श्री. एन.के. फडतरे, कृषी अधिकारी — १६ ग्रामपंचायती :
कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, अलगुडेवाडी, घाडगेवाडी, निरगुडी, मलवडी, निबळक, अंदरुड , धुळदेव, निंभोरे, बोडकेवाडी, फडतरवाडी, को-हाळे, धुमाळवाडी, मुळीकवाडी.

श्री. ए.एन. संकपाळ, विस्तार अधिकारी (शिक्षण) — ११ ग्रामपंचायती :
भिलकटी, रावडी बु., जिंती, सांगवी, कोरेगाव, रावडी खु., शिंदेवाडी, कांबळेश्वर, होळ, सोनगाव, ढवळेवाडी (निं.).

श्री एम. के.चितळकर, विस्तार अधिकारी (कृषी) — १२ ग्रामपंचायती :
सोनवडी खु., तिरकवाडी, कुरवली बु., शिंदेनगर, सरडे, राजुरी, जावली, साठे, टाकळवाडे, सोनवडी बु., पवारवाडी, जाधववाडी (ता.).

श्रीमती एस.एल. सोनवणे, विस्तार अधिकारी (कृषी) — ६ ग्रामपंचायती :
सासकल, शेरेशिंदेवाडी, ठाकूरकी, वडगाव, मिरढे, नाईकबोमवाडी.

श्री. सी.एम. शिंदे, विस्तार अधिकारी (पंचायत) — १२ ग्रामपंचायती :
सस्तेवाडी, वाघोशी, कापशी, काशिदवाडी, फरांदवाडी, घाडगेमळा, नांदल, तावडी, बिबी, हणमंतवाडी, वडजल, आळजापूर.

श्री. व्ही.व्ही. निंबाळकर, विस्तार अधिकारी (पंचायत) — ९ ग्रामपंचायती :
मुंजवडी, विचुर्णी, शेरेचीवाडी ढ., भाडळी बु., भाडळी खु., ढवळ, गुणवरे, वाखरी, झिरपवाडी.
नियुक्त प्रशासकांनी संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यभार तात्काळ स्वीकारून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, त्याखालील नियम, संबंधित कायदे व शासन आदेशांच्या अधीन राहून ग्रामपंचायतीचे कामकाज करायचे आहे. प्रशासकांची नियुक्ती ८ सप्टेंबर २०२६ पासून सहा महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे.
प्रशासक म्हणून काम करताना गैरवर्तन, लांच्छनास्पद वर्तन किंवा कर्तव्यात कसूर झाल्यास संबंधित प्रशासकास पदावरून दूर करण्याचे अधिकारही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आले आहेत.
एकूण चित्र :
८० ग्रामपंचायती | ७ प्रशासक अधिकारी |
दरम्यान यापूर्वीच्या 22 ग्रामपंचायतीची प्रशासकाची जबाबदारी सी.एम. शिंदे 5, ए. एस. गौंड 5, एम. के. चितळकर 5, व्ही. व्ही. निंबाळकर 5 व श्रीमती एस. एल. सोनवणे 2. तालुक्यातील 102 ग्रामपंचायतीवर प्रशासकराज सुरु आहे!






