आपलं फलटण प्रतिनिधी:
गौरी आगमनाच्या मंगलमय पर्वानिमित्त घराघरातील गौराईची आकर्षक, कल्पक आणि पारंपरिक पद्धतीने सजावट करणाऱ्या महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने साप्ताहिक समर्थ नायक, समर्थ प्रतिष्ठान व समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आकर्षक गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी सजावटीचा आकर्षक फोटो तसेच सजावटीबाबत थोडक्यात माहिती, स्पर्धकाचे संपूर्ण नाव संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवायचे आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असून, गौरी सजावटीतील कल्पकता, आकर्षक मांडणी, पारंपरिकता आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांच्या गौरी सजावटीचे निवडक आकर्षक फोटो साप्ताहिक समर्थ नायकच्या पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
गौराईच्या सजावटीचा फोटो आजच पाठवा!
स्पर्धकांनी आपल्या गौराईचे आकर्षक छायाचित्र, नाव व सजावटीची थोडक्यात माहिती खालीलपैकी कोणत्याही व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
संपर्क :
संपादक – गणेश भोईटे
मो. 8485077167
सहसंपादक – हिंदुराव गायकवाड
मो. 7666301536
कार्यकारी संपादक – शेखर गायकवाड
मो. 8308367415
विभागीय सहसंपादक, सातारा – सुमित काळे
मो. 8600320090






