फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी राजाळे (ता. फलटण, जि. सातारा) येथे भव्य शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक प्रबोधन, समता आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर युवकांमध्ये व्हावा, या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शिवशाहीर जयवंत बाबर (सातारा) हे आपल्या दमदार शाहिरीतून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, सामाजिक चळवळीचा आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करणार आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद फ्रेंड्स सर्कल, राजाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी नितीन कांबळे, शुभम रिटे, तानाजी रिटे, मनोज रिटे, दत्तू रिटे, अतुल रिटे, संदीप रिटे, सुनील रिटे, अनिल माने, दीपक सकट आणि अनमोल माने व मित्रपरिवार विशेष परिश्रम घेत आहेत.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा आणि शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





