फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मनसेची मागणी

आपल फलटण प्रतिनिधी :

फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर वसुलीमध्ये कथित आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर वसुलीबाबत विविध माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये गंभीर शंका निर्माण झाली असून सार्वजनिक निधीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणातील संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीदरम्यान मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची भूमिका, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी व अन्य पुराव्यांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, पुराव्यांमध्ये कोणताही हस्तक्षेप होऊ नये यासाठी सर्व संबंधित नोंदी सुरक्षित ठेवाव्यात आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
या निवेदनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही युवराज शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!