आपलं फलटण (धुळदेव प्रतिनिधी) शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे एकूण १२ विद्यार्थी पात्र ठरले.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. राधिका लालासाहेब भिवरकर व कु. तनिष्का बाबासाहेब जगताप यांनी उत्कृष्ट यश मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी ७ तर इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी ५ विद्यार्थी पात्र ठरले असून, या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या यशामागे विभागप्रमुख श्रीमती एस. बी. पेठकर यांच्यासह एस. बी. अभंग, ए. पी. गावडे, सौ. जे. एम. कोकरे, श्रीमती एस. एल. लव्हाटे, एस. सी. फडतरे व सौ. एस. आर. परमाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, स्कूल कमिटी सदस्य, धुळदेव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ
आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…





