तब्बल 38 वर्षांनी पुन्हा भरला मैत्रीचा दरबार; हनुमान विद्यालय शिंदेवाडीच्या 1986-87 बॅचचा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात

आपलं फलटण (शिंदेवाडी प्रतिनिधी ) काळ पुढे सरकत असला तरी शाळेतील आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. अशाच आठवणींना उजाळा देत रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय, शिंदेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील सन 1986-87 च्या बॅचमधील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा भव्य स्नेहमेळावा रविवार, दि. 14 जून 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल 38 वर्षांनंतर एकाच छताखाली जमलेल्या मित्र-मैत्रिणी आणि गुरुजनांच्या भेटीने संपूर्ण परिसर भावनिक आणि आनंदमय झाला होता.
या स्नेहमेळाव्यास सुमारे 60 माजी विद्यार्थी, 12 माजी विद्यार्थिनी तसेच त्या काळातील 12 शिक्षक उपस्थित होते. एकमेकांना भेटताच जुन्या आठवणींचे मोहोळ उठले. शालेय जीवनातील खोड्या, अभ्यास, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी महेश कदम, बाळासाहेब कदम, प्रमोद कदम, कल्याण भगत, जहांगीर मुलाणी, उमेश मोरे, दिलीप शिंदे, दुर्योधन काकडे, शिवाजी साबळे, पोपट हागारे, नाना रुपनवर, पोपट पवार, मालन देवकर, स्मिता भगत आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जवळपास आठ दिवस सातत्याने संपर्क मोहीम राबवत त्यांनी जुन्या विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक शोधले, व्हॉट्सअॅप गट तयार केला आणि सर्वांना एकत्र आणण्याचे मोठे काम यशस्वीपणे पार पाडले.
या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह विविध शहरांत नोकरी, व्यवसाय व उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले. तसेच आसपासच्या गावांतील शेती, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विशेष म्हणजे या माजी विद्यार्थ्यांमध्ये महानगरपालिका आयुक्त, पोलीस विभागातील अधिकारी, पीएसआय, आयटी कंपन्यांतील अभियंते, विविध क्षेत्रांतील उद्योजक, ठेकेदार तसेच अनेक यशस्वी व्यावसायिकांचा समावेश होता. विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असतानाही आपल्या शाळेबद्दलची ओढ आणि गुरुजनांविषयीचा आदर यामुळे सर्वांनी या मेळाव्यास प्राधान्य दिले.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षकही विद्यार्थ्यांच्या प्रेमळ निमंत्रणाला मान देत कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला आणि पुणे येथून उपस्थित राहिले. त्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जहांगीर मुलाणी यांच्यासह अनेक गुरुजनांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सध्या उद्योजक म्हणून कार्यरत असलेले महेश कदम आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जहांगीर मुलाणी यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात केले. यावेळी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला, तर विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हनुमान विद्यालयास साऊंड सिस्टिम भेट दिली. तसेच उपस्थित माजी विद्यार्थिनींना ‘माहेरची भेट’ म्हणून साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरला.
हनुमान विद्यालयाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे, त्या काळात तीन जिल्हे आणि चार तालुक्यांच्या सीमेवर असलेली ही एकमेव प्रमुख शैक्षणिक संस्था होती. त्यामुळे फलटण, माळशिरस आणि इंदापूर तालुक्यांसह आसपासच्या अनेक गावांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. त्यामुळे या शाळेने अनेक पिढ्या घडविल्या असून आज विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची मोठी परंपरा निर्माण केली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. निरोप घेताना पुन्हा लवकरच भेटण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तब्बल 38 वर्षांनंतर झालेल्या या संस्मरणीय भेटीने प्रत्येकाच्या मनात जुन्या आठवणींचा खजिना पुन्हा एकदा जागा झाला आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले.

“गुरुजनांचा आशीर्वाद, मित्रांची साथ आणि शाळेच्या आठवणींनी भरला भावनांचा मेळावा; 38 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले हनुमान विद्यालयाचे विद्यार्थी”

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!