धुळदेव येथे कृषीकन्यांकडून कलाकंद बनविण्याचे प्रात्यक्षिक; महिलांना व युवकांना लघुउद्योगाच्या संधींचे मार्गदर्शन

आपलं फलटण : प्रतिनिधी
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत धुळदेव येथे महिलांसाठी व युवकांसाठी कलाकंद बनविण्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश दुग्धजन्य पदार्थांपासून घरगुती तसेच लघुउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. प्रात्यक्षिकादरम्यान कृषीकन्यांनी दूध, साखर, वेलची, काजू आणि बदाम यांचा वापर करून साध्या व सुलभ पद्धतीने चविष्ट व दर्जेदार कलाकंद तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली.
यावेळी कलाकंदाची साठवणूक, पॅकिंग, विक्री तसेच बाजारपेठ निर्माण करण्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला गावातील महिलांनी विशेष उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून स्वावलंबन व रोजगारनिर्मितीच्या संधी कशा निर्माण करता येतात, याचे प्रभावी उदाहरण या प्रात्यक्षिकातून पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी कृषीकन्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या तेजश्री जाधव, वैभवी ननावरे, वैष्णवी वाघमारे, अस्मिता काटकर, सिद्धी धुमाळ, कावेरी पळसकर आणि सुवर्णा धिंदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
कलाकंद निर्मितीतून स्वावलंबनाकडे वाटचाल
दुग्धजन्य पदार्थांपासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करून ग्रामीण भागातील महिला व युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. धुळदेव येथे आयोजित केलेल्या या प्रात्यक्षिकातून कृषीकन्यांनी स्वयंपूर्णता, उद्योजकता आणि ग्रामीण आर्थिक विकासाचा प्रभावी संदेश दिला.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!