पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव रणरागिणी संस्थेच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंतांचा सन्मान

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
फलटण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (तिरकवाडी) तसेच कुरेशी मोहल्ला येथील उर्दू स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे ना. निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कुरेशी मोहल्ला येथील उर्दू शाळेतील इयत्ता दहावीची कु. इरम अक्रम बेपारी व इयत्ता बारावीची कु. जोया मोसिन कुरेशी यांचा शाळेत जाऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी रणरागिणी संस्थेच्या संचालिका रझिया शेख, सचिव मारुती टकले तसेच माजी प्राचार्या शाहीन शेख उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
चौकट : गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता आणि स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या यशाचा गौरव करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    माझेरी पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आपलं फलटण ( वृत्तसेवा ) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल,…

    Spread the love

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    आपलं फलटण: प्रतिनिधीबहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!