ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलची झेप उंचावली; १२ वर्षांच्या यशानंतर चार नव्या शाखांचा शुभारंभ

फलटण (आपलं फलटण) : गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने गेल्या १२ वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करत आता विस्ताराची नवी दिशा पकडली आहे. संस्थेच्या वतीने राजुरी (कुरवली पाटी), आसू, राजाळे (ता. फलटण) तसेच शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून चार नव्या शाखांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सचिव साधना संभाजी गावडे यांनी दिली.
या विस्ताराचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, गुरुवार दि. १९ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. राजुरी (कुरवली पाटी) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि स्पर्धात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
CBSE मान्यताप्राप्त असलेल्या या शाळेत नर्सरी ते बारावीपर्यंत LEAD संचलित अभ्यासक्रम राबविला जात असून, इयत्ता १० वी व १२ वीचा दरवर्षी १०० टक्के निकाल ही शाळेची खास ओळख ठरली आहे. यासोबतच स्कॉलरशिप, मंथन, नवोदय व सैनिक स्कूल परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी १००% यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत शाळेत रोबोटिक्स व AI लॅब, ब्रम्हांड लॅब, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय व संगणक कक्ष यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच अबॅकस, वैदिक मॅथ्स, JEE-NEET तयारी, व्यक्तिमत्व विकास, योगा, नृत्य व संगीत प्रशिक्षण यांद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना दिली जाते.
शाळेच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसर CCTV देखरेखीत असून, RO पाणी, संरक्षित भिंत, स्कूल बस सुविधा, भव्य खेळाचे मैदान, व्यायामशाळा तसेच MPSC स्पर्धा परीक्षांसाठी विशेष लायब्ररी व मार्गदर्शनाचीही सुविधा उपलब्ध आहे.
या उद्घाटन समारंभास परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ईश्वर (तात्या) गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे, उपप्राचार्या पूनम जाधव, मॅनेजर सोनाली मोरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
— गुणवत्तेची परंपरा जपत, आधुनिक शिक्षणाचा नवा अध्याय सुरू करण्यास ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल सज्ज!

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!