महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये भव्य स्वच्छता अभियान

फलटण : समाजप्रबोधनाची परंपरा जपत स्वच्छतेचा वसा अंगीकारणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात रविवारी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमात शेकडो श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शासकीय कार्यालयांचे परिसर चकाचक केले.
रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय तसेच उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुमारे ५०० ते ६०० श्रीसदस्यांनी हातात झाडू, खोरे, टिकाव, खुरपे, घमेले, दातुळ घेऊन स्वच्छतेचा धडाका लावला. गेल्या अनेक दिवसांपासून पालापाचोळा, वाढलेली झुडपे व गवत यामुळे अस्वच्छ झालेला परिसर अवघ्या तीन तासांत स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान तब्बल ११ ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुमारे १० टन सुका कचरा गोळा करण्यात आला. गोळा केलेला कचरा नगरपालिकेच्या वाहनांद्वारे डम्पिंग ग्राउंड येथे नेण्यात आला. विशेष म्हणजे, या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून ते प्रतिष्ठानमार्फत लावण्यात आलेल्या वृक्षांना देण्यात येते—ही पर्यावरणपूरक साखळी या उपक्रमाचे वेगळेपण ठरली.
फलटण विभागातील फलटण, फरांदवाडी, विडणी, नातेपुते आदी भागांतील श्रीसमर्थ बैठकीतील श्रीसदस्यांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वी केला. जयंतीनिमित्त देशभर शासकीय कार्यालयांचे परिसर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून फलटणमध्येही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.
स्वच्छतेतून समाजसेवा आणि समाजसेवेतून संस्कार अशी शिकवण देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!