पीक उत्पादनासाठी मोबाईल ॲप्सचा प्रभावी वापर; विठ्ठलवाडीत कृषीदूतांकडून प्रात्यक्षिक

आपलं फलटण प्रतिनिधी :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव (RAWE) व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत विठ्ठलवाडी येथे ‘पीक उत्पादन तंत्रज्ञान ॲप्लिकेशन’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कृषीदूत विद्यार्थ्यांनी शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ॲग्रो स्टार, किसान सुविधा, भारत ॲग्री, कृषी नेटवर्क आदी मोबाईल ॲप्सची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. प्रत्येक ॲपचा उपयोग, पीक व्यवस्थापनातील भूमिका, हवामान अंदाज, बाजारभाव, पीक संरक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच ॲप्सचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम व किफायतशीर करण्यासाठी ही ॲप्स उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे आणि प्रा. नीतीशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, ओंकार गारगोटे, धीरज पाटील, सोहम गरड, वैभवराज सुरवसे आणि तुषार ठेंगल यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल घडविणारा ठरल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!